MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 पदांसाठी भरती सुरू

MJP Bharti 2025- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran – MJP) तर्फे नवीन MJP Bharti 2025 जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 290 जागांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आपण महाराष्ट्रातील सरकारी नोकरी (Maharashtra Government Jobs 2025) शोधत असाल, तर ही एक उत्तम संधी आहे.

भरतीचा तपशील (MJP Vacancy Details 2025)

या भरतीअंतर्गत विविध गटांतील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:

  • लेखा परिक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी (Group-A) – 02 जागा
  • लेखा अधिकारी (Group-B) – 03 जागा
  • सहाय्यक लेखा अधिकारी (Group-B) – 06 जागा
  • उपलेखापाल (Group-C) – 03 जागा
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Group-B) – 144 जागा
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (Group-B) – 16 जागा
  • उच्चश्रेणी लघुलेखक – 03 जागा
  • निम्नश्रेणी लघुलेखक – 06 जागा
  • कनिष्ठ लिपिक / लिपिक-नि-टंकलेखक – 46 जागा
  • सहाय्यक भांडारपाल – 13 जागा
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 48 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

पदांच्या स्वरूपानुसार पात्रता वेगवेगळी आहे. लेखा अधिकारी आणि सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांसाठी B.Com/M.Com किंवा समतुल्य पदवी तसेच अनुभव आवश्यक आहे. अभियंता पदांसाठी Civil / Mechanical Engineering Diploma किंवा Degree असणे गरजेचे आहे. लिपिक आणि लघुलेखक पदांसाठी दहावी/पदवी तसेच Typing आणि Shorthand Skills आवश्यक आहेत.

वयोमर्यादा आणि फी (Age Limit & Fees)

  • Group-A पदांसाठी वयाची मर्यादा – 45 वर्षांपर्यंत
  • इतर पदांसाठी – 18 ते 38 वर्षे
  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग उमेदवार: ₹900/-

अर्ज प्रक्रिया (How to Apply for MJP Recruitment 2025)

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 साठी अर्ज फक्त Online Mode मध्ये सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2025 अशी आहे. परीक्षा तारखा नंतर घोषित केल्या जातील.

नोकरी ठिकाण

ही भरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी असून उमेदवारांना Maharashtra Jeevan Pradhikaran Offices मध्ये नियुक्ती मिळेल.

Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti IMP Links

Official webiste Click here
Apply OnlineClick here
Notification PDF Download

Scroll to Top