ABDM Maharashtra Recruitment 2026: आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र, मुंबई येथे ABDM State Programme Management Unit (PMU) साठी कंत्राटी तत्त्वावर 4 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत 4 पदांची भरती; थेट मुलाखत
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीसाठी (Walk-in Interview) अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी तपासून मुलाखतीस उपस्थित राहावे.
ABDM Maharashtra Bharti 2026 – पदांची माहिती
| क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | कमाल वय | मासिक मानधन |
|---|---|---|---|---|
| 1 | Chief Digital and AI Officer | 01 | 55 वर्षे | ₹5,00,000 |
| 2 | Project Lead | 01 | 55 वर्षे | ₹1,62,251 |
| 3 | Senior Software Developer | 01 | 55 वर्षे | ₹1,30,053 |
| 4 | Software Support Engineer | 01 | 55 वर्षे | ₹53,764 |
| एकूण | 04 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव
Chief Digital and AI Officer:
Computer Science, Information Technology किंवा संबंधित शाखेतील पदवी आवश्यक असून संबंधित क्षेत्रात किमान 15 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे. Digital Transformation, AI, e-Governance, Digital Health, Cybersecurity, Data Governance इत्यादी क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य दिले जाऊ शकते.
Project Lead:
B.E./B.Tech (CS/IT/EE) किंवा MCA तसेच 7 वर्षांचा IT अनुभव आवश्यक आहे. Java किंवा Microsoft technologies, web/mobile technologies, enterprise software architecture आणि project/team managementचा अनुभव अपेक्षित आहे.
Senior Software Developer:
B.E./B.Tech (CS/IT/EE) किंवा MCA तसेच 4 वर्षांचा IT अनुभव आवश्यक आहे. Java, C#, .NET, JavaScript, PHP, JSP, ASP.NET इत्यादी तंत्रज्ञानाचा अनुभव अपेक्षित आहे.
Software Support Engineer:
B.E./B.Tech (CS/IT/EE) किंवा MCA तसेच 2 वर्षांचा IT अनुभव आवश्यक आहे. Microsoft किंवा Java technologies तसेच web/mobile आणि enterprise software developmentचा अनुभव आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण
मुंबई
निवड प्रक्रिया
थेट मुलाखत (Walk-in Interview)
मुलाखत व अर्ज सादर करण्याचे ठिकाण
राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र, मुंबई
आरोग्य भवन, ८ वा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान,
सी.एस.एम.टी. रेल्वे स्टेशनजवळ, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार,
मुंबई – 01.
महत्त्वाच्या लिंक्स
| महत्त्वाची लिंक | लिंक |
|---|---|
| 📄 अधिकृत जाहिरात PDF | जाहिरात PDF पहा |
| 🌐 अधिकृत संकेतस्थळ | NHM Maharashtra Recruitment |
महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी मुलाखतीस जाण्यापूर्वी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी. मुलाखतीची तारीख, वेळ, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटींसाठी अधिकृत जाहिरातीतील माहिती ग्राह्य धरावी.


