District Court Bhandara Bharti 2026 – जिल्हा न्यायालय भंडारा येथे 08 कंत्राटी पदांची भरती
District Court Bhandara Recruitment 2026 अंतर्गत जिल्हा न्यायालय, भंडारा तसेच कौटुंबिक न्यायालय व तालुका न्यायालय (मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर) येथील ई-सेवा केंद्रासाठी मानधन तत्वावर 08 कंत्राटी कर्मचारी नेमले जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज 11 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 05:30 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
निश्चित वेळेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. सरकारी नोकरी शोधत असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.
District Court Bhandara Bharti 2026 – Overview
| संस्थेचे नाव | जिल्हा न्यायालय, भंडारा |
| पदाचे नाव | ई-सेवा केंद्र कर्मचारी |
| एकूण जागा | 08 |
| नोकरी प्रकार | कंत्राटी / मानधन तत्वावर |
| मासिक मानधन | ₹15,000/- |
| कामकाजाची वेळ | सकाळी 10 ते सायंकाळी 6 (सुटी वगळून) |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11/02/2026 |
| अर्ज सादर करण्याचे ठिकाण | जिल्हा न्यायालय, भंडारा |
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
- मराठी टंकलेखन – 30 शब्द प्रति मिनिट.
- इंग्रजी टंकलेखन – 40 शब्द प्रति मिनिट.
- MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.
- DEDAM (Data Entry & Data Management) कोर्स केलेल्यांना प्राधान्य.
निवड प्रक्रिया
पात्र अर्जदारांची न्यायालय प्रशासनामार्फत चाचणी परीक्षा घेण्यात येईल. चाचणीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
महत्वाच्या सूचना
- अर्ज विहित नमुन्यातच सादर करावा.
- आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.
- उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
Important Links
इतर महत्वाच्या भरती
- Prasar Bharati Akashvani Pune Recruitment 2026
- IAF Agniveervayu Non Combatant Recruitment 2026
- Central Sanskrit University Recruitment 2026
अशाच नवीन सरकारी व खाजगी नोकरी अपडेट साठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.



