KDMC महिला व बालकल्याण विभाग स्वयंरोजगार प्रशिक्षण २०२६
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरजू महिला व मुलींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशिक्षण २०२६ अंतर्गत महिलांना विविध कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये ऑटो रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक, General Duty Assistant, Emergency Care Assistant, योगा प्रशिक्षक, ग्राफिक डिझायनर, Data Entry Operator, Beauty Therapist, Social Media Manager, GST Assistant यांसह एकूण १७ प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. प्रशिक्षणाची पात्रता, कागदपत्रे, अर्जाचे ठिकाण आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख खाली दिली आहे.
KDMC Training 2026 – महत्त्वाची माहिती
| विभाग | महिला व बालकल्याण विभाग |
| प्रशिक्षणाचा प्रकार | स्वयंरोजगार प्रशिक्षण |
| एकूण प्रशिक्षण कार्यक्रम | १७ |
| वयोमर्यादा | १८ ते ४५ वर्षे |
| प्राधान्य | प्रथम येणाऱ्यास प्राधान्य |
| उत्पन्नाची अट | रु. २,४०,०००/- पेक्षा कमी |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | २१ ऑक्टोबर २०२६ |
| अर्जाचे ठिकाण | समाज विकास अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका |
KDMC महिला प्रशिक्षण कार्यक्रमांची यादी
महिला व बालकल्याण विभागामार्फत खालील विविध कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
| अ.क्र. | प्रशिक्षणाचे नाव | प्रशिक्षणार्थी संख्या |
|---|---|---|
| १ | ऑटो रिक्षाचे चालविण्याचे प्रशिक्षण | ४० |
| २ | सुरक्षा रक्षक यांचे प्रशिक्षण | ३० |
| ३ | General Duty Assistant | ४० |
| ४ | Emergency Care Assistant | ४० |
| ५ | योगा प्रशिक्षक | ४० |
| ६ | ग्राफिक डिझायनर | ६० |
| ७ | गेस्ट सर्व्हिस असोसिएट (फुड अँड बेव्हरेज) | ५० |
| ८ | Handloom Entrepreneur (फॅशन डिझायनिंग) | ४० |
| ९ | डाटा एन्ट्री ऑपरेटर | ६० |
| १० | हाउस किपिंग मॅनेजर | ४० |
| ११ | ब्यूटी थेरपिस्ट | ६० |
| १२ | GST Assistant | ४० |
| १३ | सोशल मिडिया मॅनेजर | ६० |
| १४ | Lab Technology Assistant | ४० |
| १५ | Optometrist Assistant | ४० |
| १६ | Bridal Fashion Portfolio Makeup Artist | ६० |
| १७ | आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंगचे प्रशिक्षण | ६० |
पात्रता व अटी / शर्ती
- अर्जदाराचे वय १८ ते ४५ वर्षे असावे.
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.
- प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
- अर्ज विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे.
- उत्पन्नाचा दाखला रु. २,४०,०००/- पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- फोटो
- उत्पन्नाचा दाखला (रु. २,४०,०००/- पेक्षा कमी)
- आधारकार्ड
- रेशन कार्ड
- १२ वी पास प्रमाणपत्र
- रहिवास प्रमाणपत्र
अर्ज कसा व कुठे करावा?
इच्छुक महिलांनी अधिकृत जाहिरातीसोबत दिलेला विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात सादर करावा.
समाज विकास अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका
अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि अर्जाचा नमुना काळजीपूर्वक तपासावा.
महत्त्वाच्या तारखा
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | २१ ऑक्टोबर २०२६ |
अधिकृत जाहिरात व अर्ज
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अधिकृत जाहिरात आणि अर्जाचा नमुना खालील PDF मधून पाहता व डाउनलोड करता येईल.
KDMC Training 2026 – FAQ
टीप: वरील माहिती अधिकृत KDMC जाहिरातीवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF मधील पात्रता, अटी, कागदपत्रे आणि अर्जासंबंधी सूचना काळजीपूर्वक वाचा.


