Nanded District Hospital Recruitment 2026: जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 30 वैद्यकीय अधिकारी पदांची भरती
Nanded District Hospital Recruitment 2026 अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड यांच्यामार्फत तदर्थ वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदांची कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये विविध वैद्यकीय विशेषज्ञांसह एमबीबीएस पात्रताधारकांसाठी एकूण 30 पदे उपलब्ध आहेत. नियुक्ती तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्हा रुग्णालय भरती 2026 – थोडक्यात माहिती
| भरती विभाग | जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड |
|---|---|
| पदाचे नाव | तदर्थ वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) |
| एकूण पदे | 30 |
| नियुक्तीचा प्रकार | कंत्राटी / तात्पुरती |
| नियुक्तीचा कालावधी | 11 महिने किंवा नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत |
| निवड पद्धत | गुणानुक्रम (Merit) व मौखिक मुलाखत |
| मुलाखत | संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरात PDF मध्ये पाहा |
| अधिकृत संकेतस्थळ | नांदेड जिल्हा प्रशासन |
पदनिहाय रिक्त जागा
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| स्त्रीरोगतज्ञ | 2 |
| बधिरीकरणतज्ञ | 5 |
| बालरोग तज्ञ | 3 |
| शल्य चिकित्सक | 2 |
| भिषक | 2 |
| नेत्र तज्ञ | 2 |
| एमबीबीएस | 14 |
| एकूण | 30 |
शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ पदांसाठी संबंधित पदव्युत्तर पदवी / पदविका पात्रताधारक उमेदवार पात्र आहेत.
जाहिरातीनुसार एमबीबीएस पात्रताधारक उमेदवारांसाठीही पदांचा समावेश करण्यात आला आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अनधिकृत गैरहजर असलेले, संपामध्ये सहभागी असलेले किंवा शासन सेवेतून शिस्तभंगाच्या कार्यवाहीतून काढून टाकलेले वैद्यकीय अधिकारी अर्ज करण्यास पात्र नसल्याचे जाहिरातीत नमूद आहे.
मानधन किती मिळणार?
| पात्रता / कार्यक्षेत्र | मासिक एकत्रित मानधन |
|---|---|
| पदव्युत्तर पदवी / पदविका विशेषज्ञ – आदिवासी व दुर्गम भाग | ₹90,000 |
| पदव्युत्तर पदवी / पदविका विशेषज्ञ – इतर भाग | ₹85,000 |
| एमबीबीएस – आदिवासी व दुर्गम भाग | ₹80,000 |
| एमबीबीएस – इतर भाग | ₹75,000 |
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणानुक्रम (Merit) आणि मौखिक मुलाखतीनुसार करण्यात येणार असल्याचे अधिकृत जाहिरातीत नमूद आहे.
अधिकृत जाहिरात व संकेतस्थळ
Nanded District Hospital Recruitment 2026 – FAQ
स्रोत: जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड यांची अधिकृत जाहिरात.


